नाशिक : आर्मी एव्हीएशनच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनच्या घिरट्या; प्रशासनाकडून गंभीर दखल

नाशिक : आर्मी एव्हीएशनच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनच्या घिरट्या; प्रशासनाकडून गंभीर दखल

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या गांधीनगर येथील आर्मी एव्हीएशन स्कूलवर गुरुवारी रात्री एक ड्रोन घिरट्या घालतांना दिसल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकचे देवळाली आर्टिलरी सेंटर आणि गांधीनगर येथील लष्करी प्रशिक्षण देणारी आर्मी एव्हीएशन स्कूल ही महत्वाचे ठिकाणी आहेत.

यांच्या सुरक्षेबाबत नेहमीच लष्करी प्रशासन सतर्क असते. मात्र पुन्हा एकदा या आर्मी एव्हीएशन स्कूलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नाशिक- पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर येथील लष्करी हद्दीतील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी असताना सुद्धा सदर परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन उडविण्यात आल्याने याची गंभीर दाखल घेण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल परिसरात ड्रोन उडत असल्याचे दिसले. यावेळी कार्यरत असलेले ड्युटी ऑपरेटर नायक जर्नेलसिंग यांनी तात्काळ याबाबत अधिकारी मनदीप सिंह यांना माहिती दिली. मनदीप सिंह यांनी खात्री केली असता सदरचा ड्रोन 800 फूट उंचावर फिरत असल्याचे दिसले. त्यानंतर फिर्यादी मनदीप सिंग यांनी त्वरित बेस सिक्युरिटी ऑफिसर लेफ्ट कर्नल व्ही रावत यांना ड्रोनबाबत माहिती देत ते फायरिंग करून पाडण्याची परवानगी मागितली. मात्र याचवेळी सदरचा ड्रोन हद्दीतून निघून गेल्याचे निदर्शनास आले.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

दरम्यान या प्रकरणी याबाबत कॅट्सकडून अधिकृतरित्या उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील ‘नो ड्रोन फ्लाईग झोन’ जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आर्मी एव्हीएशन स्कूलचा देखील समावेश आहे. यानंतर लष्करी प्रशासनाने संबंधित परिसरात संरक्षण कुंपणासह पुणे महामार्गावरील दर्शनी भागात ‘नो ड्रोन झोन’ असे ठळकपणे सचित्र इशारा दिलेला असतानाही असा गंभीर प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

दरम्यान घटनेनंतर मनदीप सिंह यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महत्वाचे म्हणजे लष्करी हद्दीत ड्रोन उडविण्यास बंदी असताना सदरचा ड्रोन हा लष्करी हद्दीत कसा आला याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790