नाशिकच्या बागलाण तालुक्यात अघोरी कृत्याचा प्रकार; आदिवासी तरुणाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अघोरी कृत्याचा प्रकार समोर आला असून जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अघोरी विद्येच्या नावाखाली आदिवासी तरुणांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नाशिकमध्ये अंधश्रद्धा खोलवर रुजल्याचे चित्र दिसू लागले आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आलियाबाद येथे एका भोंदू बाबांनी अघोरी विद्येच्या नावाखाली तालुक्यातील पिंपळकोठे येथील आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक: पत्नीचं प्रेमप्रकरण, पतीनं विचारला जाब; प्रियकराकडून पतीला संपवलं!

प्रवीण गोलचंद सोनवणे असे मृत तरुणाचे नाव असून तुळशीराम सोनवणे असे संशयित भोंदू बाबाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील प्रवीण सोनवणे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आलियाबाद येथील भोंदू बाबाकडे गावठी उपचार करण्यासाठी जात होता. भोंदू बाबाचे ही पिंपळकोठे येथे सोनवणे यांच्या घरी येणे जाणे होते.

नाशिकला खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांत मारामारी प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान सात दिवसांपूर्वी सोनवणे हा आलियाबाद येथे उपचारासाठी गेला होता, पण बाबाने अघोरीपणा करून सोनवणे याचा जीव घेत त्याला त्याच घरात टाकून बाहेर निघून गेला होता. सोनवणे घरी न आल्याने त्याचे नातेवाईक शोधू घेऊ लागले. नातेवाईकाने भोंदू बाबास कॉल केला. त्यावेळी त्यांनी प्रवीण बाहेर गेला आहे, झोपला आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

नातेवाईकांना संशय आल्याने याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता मृतदेह आढळून आला, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान साल्हेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आवारी यांनी घटनास्थळी जात शवविच्छेदन केले. मृत प्रवीण सोनवणे याचा मृत्यू कसा झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालातून समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर भोंदूबाबासह साथीदार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790