नाशिककरांनो, तुम्हीसुद्धा वीजबिल भरलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…

नाशिककरांनो, तुम्हीसुद्धा वीजबिल भरलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांनो, तुम्हीसुद्धा वीजबिल भरलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…

ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शनिवार व रविवारी ३० व ३१ जुलै २०२२ या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

त्यानुसार नाशिक परिमंडलांतर्गत नाशिक जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी सुरु राहतील.

या उपलब्ध सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्या विदुयत बिलाचा भरणा वेळेत करावा. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते, या डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790