धक्कादायक: नाशिकला तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न, काका-पुतणीचा प्रतिकार
नाशिक (प्रतिनिधी): रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करण्याचा धाडसी प्रयत्न पेठफाटा येथे उघडकीस आला.
काका-पुतणीने प्रतिकार केल्याने संशयितांचा प्रयत्न फसला.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित राम दगू सांगळे व रोहित एकनाथ मल्ले या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडितेच्या तक्रारीनुसार संशयित राम सांगळे, रोहित मल्ले हे दुचाकीने आले. दुचाकी पीडित युवतीच्या समोर उभी करत रस्ता अडवला. संशयित राम सांगळे याने तरुणीचा हात पकडून तिला दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तरुणीच्या काकांना समजला. त्यांनी घटनास्थळी येत प्रतिकार केला. गर्दी झाल्याने संशयितांनी तरुणीस शिवीगाळ करत पोलिसांत तक्रार दिली तर पाहून घेऊ, अशी धमकी देत फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक सत्यवान पवार यांनी संशयितांचा शोध घेतला.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: फूड डिलिव्हरी करणाऱ्याची इसमाची आत्महत्या
नाशिक: ‘सॉरी मला माफ करा’ अशी चिठ्ठी सोडून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत!
नाशिक: ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावत पळवली कार