👉 कॅनडा कॉर्नर येथे ऑफिस स्पेस भाड्याने देणे आहे. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा..
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकला चर्चमध्ये फादरने जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.
चर्चच्या इतिहासात अशी पहिलीच घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चौकशीची नोटीसीनंतर वादातून चर्चच्या फादरने स्वत:ला पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.१९) सकाळी शालिमार येथील सेंट थॉमस चर्चमध्ये उघडकीस आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सेंट थॉमस चर्च येथे अनंत आपटे हे फादर म्हणून २००४ ते २०१७ आणि २०१८ ते २०२१ पर्यंत कामकाज पाहत आहेत. तसेच संत आंद्रीया चर्चचाही अतिरिक्त भार आपटे यांच्याकडे आहे. अहमदनगर येथील धर्मगुरू बिशप शरद गायकवाड यांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यांच्यावर चर्चमध्ये अपहार आणि कामकाजामध्ये अनियमितता असल्याने त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9379,9371,9367″]
या तक्रारींच्या अनुषंगाने सेंट थॉमस चर्चमध्ये धर्मगुरू गायकवाड आले असता फादर आपटे त्यांना आपले म्हणणे मांडण्यास गेले होते. मात्र बिशप गायकवाड यांनी त्यांचे कुठलेही म्हणणे ऐकून न घेतल्याने “तुला काय करायचे ते कर” असे सांगितले. आणि त्यानंतर काही वेळात फादर आपटे यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले.
या प्रकाराने एकच खळबळ उडाली. काही बांधवांनी जमिनीवर टाकलेले मॅट त्यांच्या अंगावर टाकून आग विझविली. यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायाच्या खाली ते १८ टक्के भाजले. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरू केली.