news

धक्कादायक: नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार…

Ad: Shop For Sale At Central Location of Nashik…

नाशिक (प्रतिनिधी): अंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच दोन सहकारी मित्रांनी अश्‍लील वर्तन करून अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विशेष म्हणजे त्याचे हे दोनही मित्रसुद्धा अल्पवयीन आहेत…

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रंगपंचमीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; २ हजार पोलिस, ९०० होमगार्ड तैनात

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला यांचा अल्पवयीन मुलगा हा दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरातून शाळेत पायी जात असताना त्याला त्याचे मित्र भेटले.

त्यानंतर हे तिघे जण अंघोळ करण्यासाठी शिवाजीनगर येथे गेले. त्यानंतर संशयित दोन्ही विधिसंघर्षित बालकांनी संगनमत करून पीडित मुलाशी अश्‍लील चाळे केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

त्यानंतर त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले, तसेच हा प्रकार पीडित मुलाने कोणाला सांगू नये म्हणून त्याच्या डोक्यात दगड मारून व गळ्याला ब्लेड मारून जखमी केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत विधिसंघर्षित बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना समज देऊन आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790