नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या शहर परिसरातील भगूरजवळील वंजारवाडी येथे मध्यरात्री घर कोसळून पती पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..
छबु सीताराम गवारी आणि त्याची पत्नी मंदाबाई गवारी हे दोघे जण या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
पावसामुळे घराचा पाया कमकुवत होऊन घर कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
नाशिक शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वंजारवाडी गावात गुरुवारी रात्री अति मुसळधार पाऊस झाला.
त्यामुळे एका घराची भिंत कोसळल्याने पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती-पत्नीचा मृत्यू झाला.
वंजारवाडी येथे आठ दिवसांपूर्वी ढगफुटी सदस्य पाऊस होऊन दीडशे ते दोनशे हेक्टर जमीन वाहून गेली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी रात्री नाशिक शहरासह परिसरात अति जोरदार पाऊस झाला. वंजारवाडी येथेही सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता.
दरम्यान या मुसळधार पावसाची उद्याच्या शेतकामाची आखणी करून गाढ झोपी गेलेल्या पती पत्नीवर काळाने घाला घातला आहे. या पावसात वंजारवाडी परिसरात असलेल्या लालवाडी शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे. लालवाडीत असणाऱ्या गवारी कुटुंबाचा घरासह आयुष्याचा पायाच उध्वस्त झाला आहे. छबु सिताराम गवारी यांच्या घराची पहाटे तीन वाजता अचानक भिंत कोसळली. यामध्ये छबु सिताराम गवारी (वय 42) आणि मंदाबाई छबु गवारी( वय 35) यांचा झोपेतच मृत्यू झाला. रात्री हा प्रकार लवकर लक्षात आला नाही. सकाळी घडला प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली.