दुर्दैवी: घराजवळील पाण्याच्या डबक्यात पडल्याने २ वर्षीय बालकाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): आगरटाकळी रोड भागात घराजवळील पाण्याच्या डबक्यात पडल्याने २ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
आदी रमेश चव्हाण (रा.पंककृष्ण बंगला,काठे मळा) असे मृत बालकाचे नाव आहे.
आदी चव्हाण हा बालक सोमवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास आपल्या अंगणात खेळत असतांना ही घटना घडली.
- महत्वाची बातमी: नवरात्रोत्सवानिमित्त नाशिक शहराच्या या भागांत वाहतूक मार्गात बदल
- नाशिक: प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न
- Ad: नाशिकमध्ये इथे सुरु आहेत फेस्टिवल ऑफर्स. क्लिक करा…
घराशेजारी खोदलेल्या खड्यात पाऊसाचे पाणी जमलेले होते. या डबक्यात तो तोल जावून पडल्याने ही दुर्घटना घडली. सर्वत्र शोधा शोध केल्यानंतर तो पाण्याच्या डबक्यात आढळून आला. कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास निरीक्षक रहेरे करीत आहेत.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790