नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्यात रोज रुग्णसंख्या वाढतं आहे. त्यामुळे पहिलीच लाट संपलेली नाही. यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा देखील कमी नाही.हे असे असून देखील एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे आढळून येताय. यांच्यावर देखील उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात व ग्रामीण भागात पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय पालक मंत्री छगन भुजवळ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या आढावा बैठकतीत घेण्यात आला.
पोस्ट कोवीड सेंटर सुरु करण्या मागचा हेतू असा कि, कोरोनामुक्त झालेल्याना नंतरही काही समस्या उद्भवू लागल्या आहेत. काही रुग्ण बरे होऊनही पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीये किंवा काही रुग्ण मृत्यू पावले आहेत असे प्रशासनाच्या लक्षात आले. यामुळे या रुग्णांना पुन्हा उपचार घेता यावे म्हणून यांनी हे सेंटर सुरु करण्याचे ठरवले आहे. या कोविड सेंटर मधून लोकांवर पुढील उपचार केले जाणार आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून देखील लोक ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने या गोष्टीची जनजागृती करण्यात यावी हे देखील पालक मंत्र्यांनी सांगितले.