नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
घोटी सिन्नर महामार्गावर कार आणि मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात
नाशिक (प्रतिनिधी): घोटी सिन्नर महामार्गावर समोरासमोर धडक होऊन हायवा आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
अपघातात चालक मधुकर बांडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे असून त्यांना जवळच असलेल्या एस.एम.बी.टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घोटी सिन्नर महामार्गावर धामणगांव येथे सकाळी १० वाजेच्या दरम्यान साई-सर्विस स्टेशनच्या समोर ईको गाडी क्रमांक एम.एच-१५ एच.एम.२६५७ व हायवा क्रमांक एम.एच-४१ ए. यु-९००१ यांची समोरासमोर धडक होऊन गाडी चालक मधुकर बांडे हे जखमी झाले.
- मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त
- Breaking: नाशिकमध्ये हत्यांचे सत्र सुरूच, 27 वर्षीय मिरची व्यापाऱ्याची पंचवटीत हत्या
गाडीमध्ये असलेले गणेश पाटील,शांती पाटील, अनिकेत पाटील हे सर्व रा.भिवंडी व मिराबाई बनकर, नारायण बांडे व लक्ष्मीबाई बनकर राहणार भरवीर खुर्द येथील असून त्यांना स्थानिकानी एस.एम.बी.टी ॲम्बुलन्स च्या मदतीने जवळच असलेल्या एस.एम.बी.टी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहन चालक मधुकर बांडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून नशीब बलवत्तर म्हणून इको गाडीत असलेले इतर प्रवासी सुखरूप असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली व अपघाताची माहिती स्थानिकांनी घोटी पोलीस स्टेशनला दिली.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790