नाशिक (प्रतिनिधी): सिटी सेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर येथील रस्ता दुभाजकांचे सुशोभिकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर या रस्त्यावरील दुभाजकांवर लावण्यात आलेली फूलझाडे व वेली मोठ्या प्रमाणात सुकल्या आहेत. काही शोभेची झाडे व वेली यांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना अडचण होत आहे. काही ठिकाणी दुभाजक तुटले असून, त्यांचा रंगही उडाला आहे.
शोभेची झाडे, वेली यांची छाटणी करावी, आवश्यक त्या ठिकाणी वेली व झाडे लावावीत, दुभाजकाला काळा-पिवळा रंग द्यावा, संपूर्ण दुभाजकांचे सुशोभिकरण करावे, पाणी देवून वृक्ष संवर्धन करावे आदी मागण्यांचे निवेदन सोमवार, दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना देण्यात आले आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, दिलीप दिवाणे, विनोद पोळ, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, सुनीता उबाळे, शितल गवळी, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, दादासाहेब तिडके, नितीन तिडके, आशुतोष तिडके, मनोज वाणी, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, वैभव कुलकर्णी, मगन तलवार, सचिन राणे, बाळासाहेब देशमुख, संग्राम देशमुख, श्रीकांत नाईक, बापू आहेर, दीपक ढासे, बाळासाहेब राऊतराय, पुरुषोत्तम शिरोडे, राहुल पाटील, हरिष काळे, संकेत गायकवाड (देशमुख) आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत. गोविंदनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, खोडे मळा, काशिकोनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क, सुंदरबन कॉलनी आदी भागातील नागरिकांनी ही मागणी केली आहे.