नाशिक (प्रतिनिधी) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ जानेवारीनंतर फास्ट टॅग चारचाकी गाडयांना अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हा नियम १ डिसेंबर २०२७ च्या अगोदर खरेदी झालेल्या वाहनांसह एम व एन कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू आहे. त्यानुसार, मुंबईमध्ये २६ जानेवारी फास्टॅगसाठी डेडलाईन असून, विना फास्टॅग मुबंईचा टोलनाका क्रॉस करता येणार नाही.
मुंबईमधील दहिसर टोलनाका वगळता इतर ४ टोलनाक्यावर सेन्सर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. फास्ट टॅग नसेल व फास्ट टॅग मार्गिकेचा वापर केला तर, वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. ७५ % टोल नाक्यावर सुरुवातीला मार्गिकांवर ही योजना असेल, तर बाकीच्या मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सोया असेल. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केले आहे.
फास्ट टॅग लावलेली वाहने टोलनाक्यावर आल्यास, रेडिओ प्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यावर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनांवरील टॅग वाचेल. त्यानंतर टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातात व वाहनधारकाला याची माहिती त्याच्या नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावर मिळते. या योजनेमुळे टोलनाके कॅशलेस तर होतीलच शिवाय, वेळेची ही बचत होणार आहे. तर, फास्ट टॅगचे विशिष्ट अकाउंट तयार असेल, त्यातूनच टोलचे पैसे कापले जाणार असून, टोलनाक्यावर वाहनांची ओळख देखील होणार आहे.