
कश्यपी धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.
जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे दोघेही नाशिक शहरातील आंबेडकर वाडी येथील रहिवासी आहेत.
अधिक माहिती अशी की, सनी दामू रणशूर वय 26 वर्ष हा नाशिकच्या सिद्धार्थ हॉटेल समोर आंबेडकर वाडीत येथील रहिवासी होता.
बुधवारी 27 एप्रिल रोजी सनी दुपारी चार वाजेच्या सुमारास कश्यपी धरणात पोहण्याकरता गेला होता. पोहण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. मात्र पाणी खोल असल्याने त्याला त्याचा अंदाज आला नाही.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10568,10564,10551″]
यामुळे तो पाण्यात बुडाला. सनी पाण्यात बुडत असल्याचं परिसरातील नागरिकांच्या लक्षात आलं. यानंतर सनीला पाण्याबाहेर काढण्यात आलं. उपचाराकरिता त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तर दुसऱ्या घटनेत नाशिकच्या आंबेडकर वाडी परिसरातील मंगेश चंद्रकांत रोकडे वय 29 वर्ष हा सुद्धा बुधवार 27 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कश्यपी धरणात पोहण्यासाठी गेला होता. मंगेशला सुद्धा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो सुद्धा पाण्यात बुडाला होता. या दुर्घटनेत मंगेश गंभीर जखमी झाला असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला वाचविण्यात यश आले आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.