कर्मयोगीनगरमध्ये चार एकरवर भव्य उद्यान होणार; रस्ते व जॉगिंग ट्रॅकच्या कामांना गती मिळणार

नाशिक (प्रतिनिधी): शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह नवीन प्रभाग ३० मधील रहिवाशांनी गुरुवारी महापालिका आयुक्त प्रशासक रमेश पवार यांची भेट घेतली.

प्रभागातील विविध समस्या व मागण्यांचे निवेदन दिले.

कर्मयोगीनगर येथे पार्क विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

बाजीरावनगरचा २४ मीटर, गोविंदनगरचा १२ मीटर, तर कर्मयोगीनगरचा १८ मीटरचा रस्ता विकसित करण्यात येईल. अन्य मागण्या मान्य करून समस्या सोडविण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली.

चार एकरवर उद्यान, खेळाचे मैदान होणार:
पाटीलनगर, बडदेनगर रस्त्यालगत सर्वे नंबर ९९२ व ९९३ मध्ये सुमारे चार एकर क्षेत्र पार्कसाठी आरक्षित आहे, ते ताब्यात घेवून विकसित करण्याचे आश्वासन दिले. येथे भव्य उद्यान व खेळाचे मैदान होईल. संपूर्ण प्रभागातील रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

हे रस्ते होणार:
इंडिगो पार्कसमोरून गोविंदनगरकडे जाण्यासाठी १२ मीटर रस्ता, कर्मयोगीनगरहून बडदेनगर, पाटीलनगर रस्त्याला जोडणारा अपूर्ण १८ मीटर रस्ता, बाजीरावनगर ते आर डी सर्कल या ९ मीटर रस्त्याचे २४ मीटरपर्यंत रूंदीकरण ही कामे करण्याचे आदेश आयुक्तांनी शहर अभियंता नितीन वंजारी यांना दिले.

जॉगिंग ट्रॅकची कामे होणार:
आर डी सर्कल ते इंडिगो पार्कपर्यंतचे जॉगिंग ट्रॅकचे अपूर्ण काम, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण, आर डी सर्कल ते बाजीरावनगर हा नवीन जॉगिंग ट्रॅक करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

उद्यान, सभागृहांची दुरुस्ती:
महापालिकेच्या उद्यानांची स्वच्छता करून दुरूस्ती करण्यात येईल. तसेच महापालिकेच्या ताब्यातील सभागृहांची दुरुस्ती करण्यात येईल. मोकळे भूखंड स्वच्छ करण्यात येतील, असेही आश्वासन दिले.

या समस्या सोडविणार:
प्रभागात शक्य तेथे डांबरीकरण करण्यात येईल, खड्डे बुजविण्यात येतील. पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील. पावसाळी लाईन टाकण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. कर्मयोगीनगर येथील ब्लूबेल्सजवळील नाल्यावर छोटा पूल बांधण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश काढण्याचीही सूचना देण्यात आली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

यावेळी प्रभाकर खैरनार, संजय टकले, रवींद्र सोनजे, यशवंत जाधव, विठ्ठलराव देवरे, बापुराव पाटील, चतुर नेरे, कृष्णाजी विसाळे, डॉ. पराग सुपे, बासू दंडवाणी, कमलेश पारख, विजय बागडे, किरण काळे, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, भालचंद्र रत्नपारखी, डॉ. शशिकांत मोरे, अनिल राका, किशोर देवरे, हिरालाल ठाकूर, शैलेश महाजन, अशोक पाटील, नितीन रसाळ, संगिता देशमुख, सुनिता उबाळे, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, मीना टकले, उज्ज्वला सोनजे, संकेत गायकवाड (देशमुख) आदींसह रहिवाशी हजर होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790