नाशिक (प्रतिनिधी): कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी नाशिक यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिध्दीपत्रकानुसार, राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे. 12 व 13 डिसेंबर 2020 या दोन दिवसांसाठी होणाऱ्या राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswavam.gov.in या संकेतस्थळावर उमेदावारांनी नोंदणी करावी.
सदर मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदावारांनी ऑनलाईन नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी नाशिक यांनी केले आहे.