आ. सुहास कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा: पालकमंत्री भुजबळांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

आ. सुहास कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा: पालकमंत्री भुजबळांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक (प्रतिनिधी): पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षीचा नियोजन समितीचा निधी कामासाठी वर्ग करू नये अशी मागणी सुहास कांदे यांनी केली आहे.

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. आता याविरोधात आमदार कांदे यांनी भुजबळांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मागील वर्षी मंजुर कामांचा निधी वर्ग करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. “जिल्हा नियोजन समितीच्या निधी संदर्भात मी न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने हा निधी कुठल्याही कामासाठी वर्ग करू नये” अशी मागणी आमदार कांदे यांनी केली आहे. दरम्यान येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निधी कामांसाठी वर्ग झाला तर मी आत्मदहन देखील करेन असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

या मागणी वरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमधील वाद पेटणार तर आहेच, शिवाय महाविकास आघाडीतला वाद हा चव्हाट्यावर येण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान कांदे यांच्या मागणी बद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता “कांदे यांचे पत्र मी  मुख्यमंत्र्यांना दिले आहे, ते यावर योग्य ते निर्णय घेतील” असे ते म्हणाले. मात्र, जर हा निधी वर्ग केला नाही तर इतरही आमदारांचे नुकसान होईल अशी काळजी यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केली आहे….

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790