Breaking: धक्कादायक, या बाल सुधारगृहातून 4 मुले फरार, कर्मचाऱ्याला मारहाण करुन पळ
नाशिक (प्रतिनिधी): मनमाडच्या बाल सुधारगृहातून 4 मुले फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कर्मचाऱ्याला मारहाण करुन ही मुले पळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
चारही मुले गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. ही मुले फरार झाल्याप्रकरणी मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाडच्या बालसुधारगृहातून चार अल्पवयीन मुले फरार झाल्याने सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्याला मारहाण करुन ही मुले पळाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, फरार झालले चारही मुले गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. न्यायालयाच्या आदेशाने 28 ऑक्टोबरला त्यांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथून ही मुले पळून गेलीत. याप्रकरणी मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे.