अभिमानास्पद: नाशिकचा छात्रसेनेचा नूर मोहम्मद शेख दाखवणार पंतप्रधानांसमोर कलागुण!

नाशिक (प्रतिनिधी): प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातून दिल्ली येथे छात्रसेनेचे पथक गेले आहे. आज (दि. २८) दिल्लीच्या जनरल करीअप्पा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महाराष्ट्रातील विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील नूर मोहम्मद शेख हा विद्यार्थी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी शेख याने महाराष्ट्र एनसीसी संचालकाच्या वतीने दोन सांस्कृतिक कार्यक्रमांचेही प्रतिनिधित्व केले आहे. बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक यांनी शेख याचे कौतुक केले आहे. शिवाय नाशिककरांना त्याचा अभिमान आहेच !

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर मनपाची तयारी; तीन रुग्णालयांत २० खाटा राखीव
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790