अपहृत दीड वर्षाच्या मुलीचा अवघ्या काही तासांत शोध; अंबड पोलिसांची कामगिरी

अपहृत दीड वर्षाच्या मुलीचा अवघ्या काही तासांत शोध; अंबड पोलिसांची कामगिरी

नाशिक (प्रतिनिधी): अवघ्या काही तासात अपहरण झालेल्या मुलीची सुटका नाशिकच्या अंबड पोलिसांनी केली आहे. दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

अनिताकुमारी जितेंद्र भारती (वय २५, रा. बिल्डिंग नंबर 6 पाचवा मजला घर नंबर 511 चुंचाळे शिवार, घरकुल, अंबड, नाशिक) ह्या कामावर गेल्या होत्या.

त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा चॉकलेट आणण्यासाठी गेली असता त्यांची दीड वर्षाची मुलगी सुमिया जितेंद्र भारती हिचे दि. २९ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अपहरण केले.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

संध्याकाळी आई घरी आल्यावर त्यांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. मुलीचा कुठेही तपास न लागल्याने अखेर 30 तारखेला अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांनी सुद्धा लागलीच तपास करण्यास सुरुवात केली. तपास सुरू असताना गोपनीय माहिती पोलिसना मिळाली. मुलीला अपहरणकर्त्याने कुठे लपवून ठेवले आहे, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीला अटक करण्यासाठी अंबड पोलिसांच्या पथकाने सापळा रचला आणि आरोपीला अटक करण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

अवघ्या काही तासातच पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका केली आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला आई वडिलांच्या ताब्यात दिले. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू असून यात अजून कोणी आहे का याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790