सावधान नाशिककर: आता विना हेल्मेट वाहन चालवतांना आढळल्यास होणार ही कारवाई…

सावधान नाशिककर: आता विना हेल्मेट वाहन चालवतांना आढळल्यास होणार ही कारवाई…

नाशिक (प्रतिनिधी): ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ कारवाईने शहरात सुमारे ८० टक्के दुचाकीचालक हेल्मेट वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. हेल्मेट वापर करण्याचे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी आता विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विनाहेल्मेट दुचाकीचालकाचे वाहन ताब्यात घेण्यात येणार असून चालकांना पोलिस वाहनातून ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे समुपदेशनासाठी नेले जाईल. विशेष म्हणजे हे दोन तासांचे समुपदेशन पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच वाहन सोडले जाणार आहे. गुरुवार (दि. ९) पासून या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष, १७ लाखांचा गंडा

शहरातील वाहतूक सुव्यवस्थित करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ हा उपक्रम सुरू केला. शासनाच्या जुन्या परिपत्रकाची अंमलबजावणी करत १५ ऑगस्ट रोजी या उपक्रमाला प्रारंभ झाला. सुरुवातीचे दोन दिवस त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिस आयुक्तांनी या उपक्रमाची कडक अंमलबाजवणी करण्याची सूचना पंपचालकांना केल्यानंतर याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. यात ८० टक्के दुचाकीचालक फक्त पेट्रोल भरताना हेल्मेटचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले.

हे ही वाचा:  नाशिक: पोलीस अंमलदाराला चाकूने भोसकले; जखमी अवस्थेतही आरोपीला पकडले !

तसेच रस्त्यावर ५० ते ६० टक्के दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत नसल्याचे दिसून आले. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीचालकांचा हेल्मेट परिधान न केल्याने मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हेल्मेट वापराचे प्रमाण वाढण्यासाठी आता विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

अशी होणार अंमलबजावणी:
‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे चार युनिटनिहाय भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. रस्त्यावर बॅरिकेडिंग लावण्यात येऊन विनाहेल्मेट दुचाकी अडवत पुरुष, महिला चालकांचे वाहन ताब्यात घेतले जाईल. संबंधित चालकाला पोलिस वाहनातून समुपदेशनसाठी नाशिक फर्स्ट समुपदेशन केंद्रावर तज्ज्ञांकडून दोन तासांचे समुपदेशन केले जाईल. या समुपदेशनाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच संबंधित चालकाला वाहन परत दिले जाणार आहे. समुपदेशन प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मिळेल वाहन, अधिसूचना जारी

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790