नाशिक (प्रतिनिधी): विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नाशिक ते अहमदाबादला जाण्यासाठी बसभाडे ६०० ते ९०० आकारले जाते. मात्र, आता हा प्रवास विमानसेवेने याच दराने करता येणार असून, नाशिककरांचा प्रवास अधिक सुखकर व जलद गतीने होणार आहे.
नाशिकहुन अहमदाबादला जाण्यासाठी दहा ते अकरा तासांचा कालावधी लागतो. मात्र, आता ट्रूजेट कंपनीकडून नाशिक ते अहमदाबाद विमानसेवा सुरु झाली असून, अवघ्या तासाभरात नाशिकहून अहमदाबाद गाठता येणार आहे. प्रवासी वाढवण्यासाठी या कंपनीने काही दिवसांपूर्वी मर्यादित आसनांसाठी सवलत योजना सुरु केली आहे. त्यानुसार, नाशिक ते अहमदाबाद तिकीट दर ९६७ रुपये असून, अहमदाबादहून नाशिक, पोरबंदर, जळगाव, जैसलमेर कांडला या शहरांसाठी तिकीट दर ९२१ रुपये देऊ केला आहे. त्यामुळे बस भाड्याच्या किंमतीत तर २ तासांच्या कालावधीत अहमदाबादला जात येणार आहे.
5 Total Views , 1 Views Today