वाडीवऱ्हेजवळ झालेल्या अपघातात नाशिकचे चार तरुण ठार..

वाडीवऱ्हेजवळ झालेल्या अपघातात नाशिकचे चार तरुण ठार..

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई- आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हेजवळ दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मुंबईकडे जाणारा ट्रक डिव्हायडर तोडून नाशिककडे येणाऱ्या एका कारवर जोरदार धडकल्याने कारमधील नाशिकचे चार तरुण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला.

रिजवान इक्बाल कुरेशी (वय ३२, चौक मंडई), जुबेर इक्बाल शेख (वय ३५, अशोका रोड), हुजेफा (सोनू) अंजूम उस्मानी (वय ३२, नागजी चौक), सोहेल अकील पठाण (वय २२, विनयनगर) यांचा अपघातात मृत्यू झाला असून नबील रऊफ सय्यद (वय २१, नाईकवाडीपुरा) हा गंभीर जखमी झाला. ऐन ईदच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत होती. बुधवारी सकाळी नमाज पठनानंतर सर्व तरुण फिरण्यासाठी त्र्यंबकेश्वरला गेले होते. घोटीमार्गे नाशिककडे परतताना बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान अपघात झाला. अशोका रोडवर राहणारे जुबेर यांचे वडाळा नाक्यावर रेडियमचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. रिजवान कुरेशी यांचा मटन व्यवसाय होता. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. सोहेल पठाण यांचेही दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हुजेफा सय्यद यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790