14 तासांपासून कसारा रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या एक्सप्रेस गाड्या आता नाशिककडे रवाना
नाशिक (प्रतिनिधी): मागील 14 तासांपासून कसारा रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या एक्सप्रेस गाड्या आता नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात येत आहेत. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कसारा इगतपुरी मार्ग वरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. मात्र त्यातील डाऊन मार्गावरील एक लाईन सुरू करण्यात आली आहे. या लाईनहुन पंजाब मेल एक्सप्रेस आणि त्यानंतर मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात येत आहेत . अप मार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून या मार्गावर काम सुरू आहे. लोणावळ्यात तर दहा तासांत 163 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. तर गेल्या 34 तासांत 553 मिमी पाऊस कोसळला आहे. यामुळे लोणावळ्यातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचा प्रवाह वाढला असून पात्र सोडून ती वाहू लागली आहे. परिणामी सखल भागात पाणी शिरले आहे. काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे.