येत्या दोन दिवसात नाशिक शहरातील हे कोविड सेंटर सुरु होणार

नाशिक (प्रतिनिधी): मार्च महिन्यापाठोपाठ एप्रिल महिन्यात कोरोनाचा हाहाकार सुरू होत असल्यामुळे शहरातील रुग्णसंख्या तब्बल १८ हजारांच्या घरात गेली असून ही बाब लक्षात घेत समाजकल्याण व पंजाबराव देशमुख कोविड केअर सेंटरपाठोपाठ त्र्यंबकरोडवरील तीनशे खाटांचे ठक्कर डोम येत्या दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे.

एकीकडे रुग्णांना बेड मिळत नसल्याची तक्रार असताना महापालिकेने मात्र ४८८५ खाटा आरक्षित केल्याचा दावा केला आहे. महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर गेला असून दिवसाला आता तीन हजार रुग्ण आढळण्याचे प्रकार सुरू झाले आहे. पालिकेने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरगुती अलगीकरणामध्ये ठेवले असल्यामुळे सुरुवातीला बेडची फार चिंता वाटत नव्हती.

हे ही वाचा:  नाशिक: पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मात्र घरगुती अलगीकरणांमध्ये असलेले रुग्ण नियम पाळत नसल्यामुळे त्यांच्यापासून अन्य संपर्कातील व्यक्तींना संसर्ग वाढत गेला. त्याचा परिणाम म्हणून मार्च महिन्यात तब्बल तीस ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रविवारी उच्चांकी तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यामुळे हा आतापर्यंतचा विक्रम ठरला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे महापालिकेला आता सरकारी व खासगी दवाखान्यामधील खाटांची संख्या वाढवणे गरजेचे झाले असून आयुक्त कैलास जाधव यांनी युद्धपातळीवर सरकारी व खाजगी रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, प्रथम समाज कल्याण येथील ५०० खाटांचे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्यानंतर मेरी येथील पंजाबराव देशमुख कोविड केअर सेंटर येथे १९० बेड सुरू करण्यात आले. आता ठक्कर डोम येथील तीनशे बेडचे कोविड केअर सेंटर येत्या दोन दिवसात सुरू केले जाणार आहे.४६६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध..

हे ही वाचा:  राज्यात ढगाळ वातावरण कायम, 'या' भागांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता...

पालिकेने शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमधील ४८८५ खाटा आरक्षित केल्या आहेत. त्यात १६७९ जनरल बेड, २०२८ ऑक्सिजन बेड तसेच ६७२ आयसीयू बेड, ४६६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांत ४६ खासगी रुग्णालयांमध्ये ६६४ ऑक्सिजन बेड, १३० व्हेंटिलेटर बेड तर ९१ आयसीयू बेड असे ८८५ बेड वाढवले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790