मोबाइल नसल्याने अभ्यास अपूर्ण; नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): मोबाईल नसल्याने अभ्यास अपूर्ण राहत होता त्यामुळे विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
महाविद्यालय सोमवारपासून सुरु झाले परंतु, अँड्रॉइड मोबाईल नसल्याने तसेच दुसऱ्याचा मोबाईल घेऊनही पुरेसे नेटवर्क मिळत नव्हते.
अभ्यास अपूर्ण राहिल्याने नैराश्यात गेलेल्या सुरगाणा तालुक्यातील हातरुंडी येथील अकरावी विज्ञान शाखेतील एका विद्यार्थिनीने सोमवारी सकाळी घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. अलंगुण येथील पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळेत भारती तुकाराम चौधरी (वय १७, रा. हातरूंडी) शिकत होती.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9819,9822,9824″]
कोरोनामुळे गेले काही दिवस कनिष्ठ महाविद्यालये बंद होते. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास सुरु होता. परंतु, अँड्रॉइड मोबाइल नसल्याने इतरांचा मोबाइल घेऊन भारतीने कसाबसा अभ्यास पूर्ण केला होता. परंतु, बराचसा अभ्यास बाकी असल्याने ती निराश होती. मात्र, सोमवारपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू झाले. परंतु, आपला बराच अभ्यास अपूर्ण असल्याने भारती गोंधळात होती. त्यामुळे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
आदिवासी तसेच काही दुर्गम भागांत काही विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने ऑनलाइन अभ्यासाबाबत त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, अशाच परिस्थितीला तोंड देताना घडलेल्या या घटनेमुळे चिंता व्यक्त होत आहे.