Live Updates: Operation Sindoor

मुंबई नाका: मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी युवक ठार

मुंबई नाका: मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी युवक ठार

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिसरोडवर खासगी मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.

याप्रकरणी बसचालकास अटक करून मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक सिद्धार्थ बिरारी (रा. पांगरे मळा, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (ता. २२) रात्री सव्वा दहाच्या सुमारास सदरची घटना घडली.

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

मुंबई नाका हद्दीतील महामार्गालगत असलेल्या रॉयल इनफिल्ड बुलेटच्या शोरुमसमोर खासगी मिनी बसच्या (एमएच ४६ बीबी ९८१९) खाली अज्ञात युवक झोपलेला होता. बसचालकाने रात्री सव्वा दहाच्या सुमारास निष्काळजीपणे बस चालवून नेली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: केटीएचएम कॉलेज येथे आज (दि. ७ मे) झालेल्या मॉक ड्रिलची क्षणचित्रे…

त्यावेळी झोपलेल्या अज्ञात युवकाच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. यात गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी बसचालक राकेश रमेश परदेशी (३७, रा. बारा बंगला रोड, इगतपुरी) यास अटक करण्यात आली असून, त्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790