नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक -पुणे महामार्गावरील डीजीपी नगर-१ येथे शनिवारी (दि.१९) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून बोलावून घेत कुख्यात गुन्हेगार बाबा शेख याच्यावर गोळी झाडून खून केल्याची घटना घडली.
काही दिवसांपूर्वी बाबाचे काही तरुणांसोबत भांडण झाले होते. त्याच संदर्भात ‘मागचे भांडण मिटवुन टाकू, तू भेटायला ये’ असे सांगून कुख्यात गुन्हेगार नवाझ उर्फ बाब्या शेख (वय २८) यास रेजिमेंटल प्लाझा येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्याला दुचाकीवरून डीजीपी नगर -१ जलशुद्धीकरण केंद्राजवळ घेऊन आले. त्याठिकाणी संशयित समीर खान उर्फ मुर्गा राजा आणि अर्जुन पिवाल हे दोघे होते. यावेळी मुर्गा राजा याने आपल्या जवळील बंदुकीतून बाबावर पाठीमागून गोळी झाडली.
त्यानंतर बाबा जखमी अवस्थेत पडल्याने त्या ठिकाणहून सशयितांनी पळ काढला. यावेळी जखमी बाबाने तेथील जाणाऱ्या नागरिकांच्या फोनवरून त्याचे काका इरफान शेख याना घटनेची माहिती दिली. तसेच उपनगर पोलिसाना कळवले. त्यानंतर बाबा शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संशयित हल्लेखोरांविरुधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस उपयुक्त विजय खरात, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले.