नाशिकला महिला पोलिसास शिवीगाळ; वाहतूक पोलिसास मारहाण!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथे नियंत्रण कक्षात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसास एका इसमाने विनाकारण फोन करून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला द्वारका सर्कल येथे वाहतूक नियंत्रण करत असलेल्या पोलिसास एका व्यक्तीने शिवीगाळ तसेच मारहाण केल्याची घटना घडली.

संशयित खिलारे नामक एका इसमाने बुधवारी (दि.२३ डिसेंबर) रोजी साडेचार वाजेच्या सुमारास नियंत्रक कक्ष नाशिक येथे विनाकारण फोन केला. दरम्यान, फिर्यादी कर्तव्य बजावत असतांना खिलारे याने त्याच्या मोबाईलवरून वरून कंट्रोल रुम नाशिक शहरच्या हेल्प लाईन क्रमांक ०२५३२३०५२३४ वर फोन केला. दरम्यान, खिलारे याने पोलीस महिलेस असभ्य भाषेत शिवीगाळ करून अपमान केला. म्हणून, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तर, फिर्यादी प्रदीप चरणदास पाटील (वय ३१, रा.शहर वाहतूक शाखा द्वारका विभाग, नाशिक) हे बुधवारी (दि.२३ डिसेंबर) रोजी वाहतूक नियंत्रण करत होते. दरम्यान, साडेदहाच्या सुमारास संशयित आरोपी बाळासाहेब कुडीराम महाजन (वय ४२, रा. फुलेनगर, पेठरोड नाशिक) याने ट्रक (क्रमांक एमएच १५ एफएच ५००१) नो एंट्री मध्ये थांबवला. त्यावेळी फिर्यादी यांना महाजन याने “तुम्ही पोलिसवाले सगळे खूप माजलेले आहेत, जर, माझ्या गाडीवर पेंडिग केस आली तर मी तुला दाखवतो, तुला खल्लास करेन” असे म्हणत फिर्यादीची गच्ची पकडून मारहाण केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790