महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत मंगळवारी (दि. २७ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
नाशिक शहरातील काही भागांत मंगळवारी (दि. २७ सप्टेंबर) रोजी सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे सांगितले आहे.
त्याचप्रमाणे बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे.
महानगरपालिका सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपुर अशोक नगर व नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी 1200 मी.मी. व्यासाची पी.एस.सी सिमेंटची गुरुत्व वाहीनीला महिंद्रा कंपनी MQS Gate कंपाऊंडलगत प्रभावती हॉस्पिटल समोर 1200 मी मी व्यासाच्या पी एस सी सिमेंट पाईपलाईनला पाणी गळती सुरु झाली आहे.
सदर दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. यास्तव मंगळवार दि. 27/09/2022 रोजी सदरील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असुन, खालीलप्रमाणे नमुद संपुर्ण सातपुर जूना प्रभाग क्रमांक 8, 10 व प्रभाग क्रमांक 11 भागश: मधील प्रबुद्ध नगर परिसर, तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 7 (भागश:) मंगळवार दि. 27/09/2022 रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व बुधवार दि. 28/09/2022 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
- नाशिक: प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न
- महत्वाची बातमी: नवरात्रोत्सवानिमित्त नाशिक शहराच्या या भागांत वाहतूक मार्गात बदल
- नाशिकच्या सर्व छोट्या जाहिराती वाचण्यासाठी इथे क्लिक करा…
सातपूर विभागातील जुना प्रभाग प्र.क्र. 8, व 10 चा संपूर्ण परिसर व प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्ध नगर परिसर, नाशिक पश्चिम विभागातील :प्रभाग क्रमांक.7 (भागश:) मधील गंगापूर रोडवरील माणिक नगर ,श्रमिक कॉलनी , गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन परिसर, विनय कॉलनी ,सहदेव नगर सुयोजित गार्डन ,दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन सोसायटी, चैतन्य नगर ,आयाचित नगर निर्मला कॉन्व्हेंट शाळा इत्यादी सर्व परिसर.. वरील प्रमाणे नमूद परिसरात दिनांक 27/09/2022 मंगळवार रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहील.