महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत गुरुवारी (दि. १२) पाणीपुरवठा नाही

महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत गुरुवारी (दि. १२) पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी विभागाअंतर्गत पेठ रोड गंगापूर डावा तट कालव्याजवळ, दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणा-या उर्ध्ववाहिनीला गळती लागली आहे.

हे काम तातडीने करणे आवश्यक असल्याने उर्ध्ववाहीनी दुरुस्तीचे काम गुरुवार (दि. 12) रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभावरुन प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये होणा-या पाणीपुरवठ्यावर परीणाम होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट...

प्रभाग क्र. 1 मधील शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै) तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील चांदशी रोड, गंगावाडी रोड, फडोळ मळा, रामकृष्ण नगर, पिंगळे नगर, एरिकेशन कॉलनी, मानकर नगर, महालक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, कल्याणी व राजेय सोसायटी, मेहेरधाम, गॅस गोडावून, यशोदानगर, पेठरोड या परिसरात गुरुवार दि. 12 जानेवारी रोजी दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  कलिंगडाच्या दरावरून वाद चिघळला; विक्रेत्याच्या मुलाकडून ग्राहकावर प्राणघातक हल्ला

प्रभाग क्र. 1 मधील दुर्गा नगर, शिव समर्थ नगर, जुई नगर, ओंकार बंगला परिसर शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै.) प्रभाग क्रमांक 4 मधील कॅन्सर हॉस्पीटल मागील परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर तुळजाभवानी नगर, हमालवाडी परिसर, पवार मळा परिसर तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील मखमलाबाद गाव, मखमलाबाद रोड पश्चिम भाग, मातोश्री नगर, विद्या नगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी, कोळी वाडा, घाडगे नगर, एरिकेशन कॉलनी (पै.), मानकर नगर (पै.), जयमल्हार कॉलनी, अश्वमेघ नगर, सप्तरंग सोसायटी या परिसरात शुक्रवार (दि. 13) सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. ११) महत्वाचे बदल

याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790