🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

महत्वाची बातमी: या १८ रेल्वे गाड्या मेगाब्लॉकमुळे तीन दिवस रद्द

महत्वाची बातमी: या १८ रेल्वे गाड्या मेगाब्लॉकमुळे तीन दिवस रद्द

नाशिक (प्रतिनिधी): नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून १ ते ९ जानेवारी दरम्यान मुंबईत कळवा-दिवादरम्यान रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने पंचवटी, तपोवन, नंदीग्राम, जनशताब्दीसह मनमाड-नाशिकमार्गे जाणाऱ्या जवळपास १८ महत्त्वाच्या प्रवासी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

गेल्याच आठवड्यात मुंबईपाठोपाठ नांदगाव रेल्वे स्थानकात घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला तर पंचवटी, जनशताब्दीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या.

एसटी संपही सुरु असल्याने आता प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

रद्द गाड्या अशा : जालना-मुंबई-जालना अप-डाऊन जनशताब्दी एक्स्प्रेस (दि. २), मनमाड – मुंबई -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (दि. २), मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (दि. २ व ३), नागपूर- मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (दि. १ व २), नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (दि. १ व २).

ट्रॅफिक ब्लॉकच्या दुसऱ्या फेजमधील रद्द गाड्या अशा : मुंबई-जालना जनशताब्दी अप-डाऊन (दि. ८ व दि. ९), मनमाड-मुंबई -मनमाड पंचवटी अप आणि डाऊन (दि.८ व दि.९), मुंबई -अदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (दि.८, दि.९ आणि दि.१०), नागपूर-मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस अप-डाऊन (दि ७, दि.८, दि.९, दि.१०), मुंबई-नांदेड मुंबई एक्स्प्रेस (दि.८, दि.९, दि.१०), नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (दि.७, दि ८, दि ९).

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790