Jobs in Nashik: Require Telecaller (Female) in Nashik. Click Here For More Details.
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागात बुधवारी (दि. २३ फेब्रुवारी) पाणीपुरवठा नाही
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महापालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.
नाशिक शहरातील काही भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील म्हसरुळ व बोरगड जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र आवारात लिकेज झाल्याने सदरचे काम तातडीने करणे आवश्यक आहे.
सदर उर्ध्ववाहीनीचे दुरुस्ती करणेचे काम बुधवार दि. 23/02/2022 रोजी हाती घेणेत येणार असल्याने म्हसरुळ व बोरगड जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.1 मधील ओंकारनगर, वृंदावननगर, प्रभातनगर, दिंडोरी रोड राणा हॉटेलपर्यंत, म्हसरुळ मखमलाबाद लिंकरोडवरील पूर्ण परिसर, ओमनगर, गणेशनगर, स्नेहनगर, गुलमोहरनगर, शनिमंदिर परिसर, म्हसरुळ गावठाण, संभाजीनगर, बोरगड आश्रमशाळेजवळील परिसर, आदर्शनगर, एकतानगर, प्रभातनगर परिसर, पेठरोड, जकातनाका, वेदनगरी, उज्ज्वलनगर इ. तसेच प्र.क्र. 6 मधील कल्याणी व राजेय सोसा, मेहेरधाम, गॅसगोडावून, इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठरोड, जकातनाका परिसर, नमन हॉटेल परिसर, संत सावतानगर, डीटीपीनगर इत्यादी परिसरात बुधवार दि. 23/02/2022 रोजीचा सकाळचा, दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे गुरुवार दि.24/02/2022 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल असे कळविण्यात आले आहे.