‘मला कॉल कर नाहीतर..’ नाशिकमध्ये शाळकरी मुलीसोबत तरुणाचं घृणास्पद कृत्य, तिच्या वडिलांनाही मारहाण

‘मला कॉल कर नाहीतर..’ नाशिकमध्ये शाळकरी मुलीसोबत तरुणाचं घृणास्पद कृत्य, तिच्या वडिलांनाही मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह महाराष्ट्रात शाळकरी मुलींचा विनयभंग, अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे.

अशा अनेक घटना ताज्या असताना आता नाशिक शहरातील नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तीन दिवसांत घरफोडीचा उलगडा; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपी अटकेत

येथील एका तरुणानं १३ वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे.

आरोपीनं दिवसाढवळ्या पीडित मुलीचा पाठलाग करून तिला ‘मला कॉल कर नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मारेन’ अशी धमकी दिली.

आरोपीच्या या धमकीमुळे घाबरलेल्या पीडित मुलीनं हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी आरोपीला याबाबत जाब विचारला असता, आरोपी पीडित मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली आहे. पीडित मुलीचा विनयभंग आणि त्यानंतर वडिलांना केलेल्या मारहाणीप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिऱ्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हा बँकिंग रोडमॅप: सर्वसमावेशक विकासासाठी १० धोरणात्मक स्तंभ

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10319,10313,10311″]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेतून घरी येत असताना, आरोपीनं तिचा पाठलाग केला होता. आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. रेहान शेख असं आरोपीचं नाव असून आरोपीनं पीडित मुलीला एकांकात गाठून ही धमकी दिली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून (गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0096/2022) पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790