नाशिक शहरातील इंदिरानगर भागात बापाने स्वतच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील इंदिरानगर भागातून संतापजनक घटना समोर आली असून जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर त्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील इंदिरानगर भागातील गजबजलेला परिसर असलेल्या वडाळा पाथर्डी रस्त्यालगत परिसरात नराधम बापाने स्वतच्या साडेचार वर्षांच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
डिग्री पूर्ण करा, 90 दिवसांची शिक्षेत सूट मिळवा, नाशिकरोड कारागृहात अनोखा शिक्षण उपक्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि संशयित यांचा 2017 मध्ये विवाह झाला असून पती दारू पिऊन मारहाण करतो, म्हणून फिर्यादी आई-वडिलांकडे माहेरी नांदगाव येथे निघून गेल्या होत्या. या दरम्यान, त्या 12 फेब्रुवारी 2013 मध्ये मालेगाव न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या होत्या. त्यावेळी न्यायालयात सुनावणीच्या वेळी पीडित मुलगी वडिलांना पाहून रडू लागली. तसेच, त्यांच्याकडे जाण्याचा हट्ट केला म्हणून काही दिवसासाठी मुलीला वडिलांबरोबर नाशिक येथे पाठवून दिले.
नाशिक: शेअर्स घोटाळ्याप्रकरणी नाशिकमधील सहा एजंट्सना अटक
मात्र 6 एप्रिल 2013 रोजी गावची यात्रा असल्याने फिर्यादी मुलीला घेण्यासाठी नाशिक येथे त्यांच्या बहिणीकडे आल्या होत्या. त्यावेळी मुलीला घेऊन वडील आले. परंतु त्यांनी फिर्यादीबरोबर मुलीला पाठवले नाही. त्यामुळे फिर्यादी पुन्हा नांदगावला परत निघून गेल्या. फिर्यादीची बहीण मुलीला घेऊन नांदगावला आले. तिने तिला वेदना होत असल्याचे सांगत होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हाळ्यामुळे त्रास होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन फिर्यादी महिलेने कानाडोळा केला. परंतु वेदना सुरूच असल्याने डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर मुलीसोबत गैरकृत्य झाल्याचे समोर आले. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने तिच्या पतीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या वडिलांवरोधातच अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790