बदनामीची धमकी देत युवकाने केला युवतीचा विनयभंग; तिच्याकडून पैसेही उकळले

बदनामीची धमकी देत युवकाने केला युवतीचा विनयभंग; तिच्याकडून पैसेही उकळले

नाशिक (प्रतिनिधी): “माझ्या सोबत लग्न कर नाही तर तुझ्या सासरच्यांना सांगून तुझी बदनामी करेल” अशी धमकी देत युवतीकडून पैसे उकळणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे.

मुज्जफर जहूर भुरे रा. सारडा सर्कल असे या संशयिताचे नाव आहे.

मुंबईनाका पोलिस ठाण्यात विनयभंग, खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आठवीच्या अपहृत विद्यार्थ्याचा खून; वडीवऱ्हे येथे आढळला मृतदेह

पोलिसांनी दिलेली माहिती व पीडितेच्या तक्रारीनुसार, संशयितासोबत ओळख आहे. वेळोवेळी घरी येऊन तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर सासरच्यांना आपल्याबद्दल सांगून तुझी बदनामी करेल अशी धमकी देत युवतीकडून पैसे उकळले. तसेच लग्न मोडण्याचाही प्रयत्न केला, अशी तक्रारी पिडीत युवतीने पोलिसांकडे केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: बापानेच केला मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिक: रिक्षाचालकाने मारहाण करत प्रवाशाला लुटले

हे ही वाचा:  Breaking: नाशिक हादरलं…नाशिकमध्ये पुन्हा खून; २ जण पोलिसांच्या ताब्यात

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790