बँकेतील महिला व्यवस्थापकावर चाकूने जीवघेणा हल्ला!

नाशिक (प्रतिनिधी) : महात्मा गांधी रोडवरील आयडीबीआय बँकेतील महिला व्यवस्थापकावर चाकूहल्ला करून पैश्यांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमर बोडके (रा. तारवालानगर) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणात तृप्ती अग्रवाल यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार तृप्ती अग्रवाल या आयडीबीआय बँकेच्या एम.जी. रोड या शाखेत सर्व्हिस ऑपरेशन व्यवस्थापक असून सोमवारी (दि.०७) दुपारी त्या केबिनमध्ये काम करत असतांना संशयिताने अचानक आत प्रवेश केला आणि त्यांच्या मानेवर चाकू लावून “मला जगण्यासाठी दहा लाख रुपये द्या, मला पैसे काढून द्या” असा आग्रह करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अग्रवाल यांनी आरडओरड केली असता बँकेतील इतर सहकारी त्यांच्या मदतीला धावून आले. तोपर्यंत संशयिताने दुसऱ्या हाताने अग्रवाल यांचा गळा आवळला. मात्र पोलीस वेळीच तेथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790