पंचवटीत दुचाकी चोरून पळणारे विंचूरला जेरबंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पंचवटीत रविवारी सकाळी घरफोडी करत मोटरसायकल चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या ५ तासात जेरबंद केले.

ग्रामीण पोलिसांचे विशेष निरीक्षक बर्डीकर, हवालदार रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इम्रान पटेल नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकाला दोन संशयित वेगवेगळ्या मोटारसायकलवर येवल्याच्या दिशेने जात असताना दिसले.

हे ही वाचा:  लिफ्ट मागायची, गुंगीचे औषध देत लुट करणारी टोळी गजाआड; मुख्य सूत्रधार महिलेसह 5 जणांना अटक

दोन्ही मोटारसायकलच्या मागील व पुढील नंबरप्लेट या वाकवलेल्या असल्याने गस्तीवरील पोलिसांना संशय आला. या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी मोटारसायकलचा वेग वाढवला. त्यामुळे पोलिसांनीही मोटारसायकलस्वारांचा पाठलाग केला मात्र, चोरट्यांना त्यांना चकवा देत येवला तालुक्यातील नेवरगाव शिवारातील शेताजवळ चोरीच्या मोटारसायकल टाकून दिल्या व शेजारील उसाच्या शेतात लपले होते.

पोलिसांच्या पथकाने पावलांच्या ठशावरून चोरट्यांचा माग काढत गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेताला घेराव घालत चोरट्यांना जेरबंद केले. ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाच्या सतर्कतेमुळे पंचवटीतील घरफोडीत चोरी गेलेल्या दुचाकी व चोर ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हे ही वाचा:  नाशिक: तीन अनधिकृत शाळांना‎ तब्बल 9.78 कोटींचा दंड; शाळामालक, मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल होणार‎

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790