नाशिक: ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी

नाशिक: ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी

नाशिक (प्रतिनिधी): ९ वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कर करून तिला व तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

रवींद्र चौहलसिंग बहोत (३६, रा. महात्मा गांधी धाम, देवळाली गाव असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या...

गुरुवारी (दि. १६) जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली.

अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजता देवळालीगावातील बकालवाडी सार्वजनिक शौचालय येथे पीडित ९ वर्षांची मुलगी शौचालयात गेली असताना आरोपी रवींद्र बहोत हा तिच्या पाठीमागे गेला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी महाआयडी तयार करावा

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10946,10944,10937″]

तिला शौचालयात कोंडून तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत असताना आरोपीने तिच्या गालात मारून कुणास काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना जिवे मारेल अशी धमकी दिली. उपनगर पोलिस ठाण्यात आरोपी बहोत याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

तत्कालीन महिला उपनिरीक्षक एस. डी. तेली यांनी तपास केला. आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करत गुन्हा साबित होण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने पंच, साक्षीदार आणि फिर्यादी यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांना सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790