नाशिक: होंडा सिटी कारची मोटरसायकला धडक; 1 ठार, 1 जखमी

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: होंडा सिटी कारची मोटरसायकला धडक; 1 ठार, 1 जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-वणी रस्त्यावरील वणी येथील शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिरा समोर भरधाव कारने मोपेडला उडविल्याने मोटरसायकलवरील एक ठार तर एक जखमी झाला आहे.

वणी शिवारातील शंखेश्वर मंदिरासमोर आज (दिनांक २२ फेब्रुवारी रोजी) दुपारी १. ४५ वा. सुमारास आहे. एम एच ४३एन७२९५ ह्या होंडा सिटी कारने एम एच १५जी वाय ४५२२ या मोपेड ला धडक दिली.

नाशिक: साप चावला तरीही ती स्कुटीवर रुग्णालयात आली, मात्र; आईसमोर 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

कार ही नाशिक कडून वणीच्या दिशेने भरधाव वेगात येत होती चालकाचे नियंत्रण सुटले व कारने दोन तीन पलट्या घेत रस्त्याच्या बाजुला मुर्ती बनविणा-याच्या ठिकाणावर धडकली.

Get Your Own Axis Bank Privilege Credit Card

यावेळी मोपेड वरून जाण्या साठी निघालेल्या राहुल अमरनाथ भाटी (वय २६ रा. मानवता हॉस्पीटल समोर, वणी) हा मयत झाला असुन महिला मनीषा विक्रम पवार (वय २० वर्षे रा . दत्त नगर वणी) ही जखमी झाली असुन नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

नाशिक: लाकडी दांडक्याने मारून पत्नीचा खून; शवविच्छेदनामुळे संशयित पतीचा बनाव उघड

गाडीचा चालक व त्याच्या बरोबर असलेले अपघात स्थळावरून पळुन गेले आहे. राहुल भाटी हा दगडाच्या मुर्ती बनविणारा होता.अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत होता.वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group