नाशिक: सीबीएसला बसने दिलेल्या धडकेत २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक: सीबीएसला बसने दिलेल्या धडकेत २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकहून नंदुरबारला जाणाऱ्या MH15BL3445 ह्या बसने एक 21 वर्षीय विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना घडली आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच सीबीएसच्या सिग्नल वर ही दुर्दैवी घटना घडली आहे.

रस्ता ओलांडत असतांना या विद्यार्थिनीला एसटी बसने चिरडलं.

मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव वैशाली शिवाजी गायकवाड आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून ही बस निघाली होती. सिग्नल वरून गाडी वळवत असताना अंदाज न आल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. घटना स्थळी असलेल्या नागरिकांनीच वैशालीला जिल्हा रुगणालायत उपचारा करिता आणले. मात्र तिची तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: गाड्या फोडत दहशत पसरविण्याचा प्रयत्न; अर्ध्या तासात संशयित ताब्यात
सिगारेटचे चटके देऊन विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

Loading

हे ही वाचा:  Nashik Breaking: दुभाजक तोडून आयशरची कारला धडक; चार जण जागीच ठार

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790