नाशिक: सिडकोत 54 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांचे पाऊल

नाशिक: सिडकोत 54 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांचे पाऊल

नाशिक (प्रतिनिधी): सिडको भागात व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या तडीपारचे प्रस्ताव तयार केले आहेत. यातील काही प्रस्तावांना मान्यता मिळाली असून काही प्रस्ताव लवकरच मान्य होणार आहेत. यामुळे सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार असून गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी अंबड पोलिसांनी पाऊल उचलले आहे.

अंबड पोलिसांनी दिड महिण्यात सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे व रेकॉर्ड वरील १२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तर २२ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजुरी साठी पोलिस आयुक्तांकडे पाठविले आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

तर १० गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकूण ५४ गुन्हेगारांचे तडीपार प्रस्ताव केले असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी दिली. पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

तर ४२ तडीपार प्रस्ताव मध्ये कोणाचे नाव आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबड पोलिस ठाणेच्या हद्दीत सिडको , खुटवडनगर , उंटवाडी, कामटवाडे, डिजीपीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत परिसर आहे. अंबडगाव, अंबड औद्योगिक वसाहत, तसेच चुंचाळे साठी पोलिस ठाणे प्रमाणे काम चालणारे स्वतंत्र पोलिस चौकी निर्मिती केली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

सिडको व परिसरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. यात दोन पेक्षा जास्त गुन्हे असणारे गुन्हेगार, तसेच सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे गुन्हेगार, तसेच पोलिस रेकॉर्ड वर असलेले गुन्हेगार यांची माहिती जमा करून त्यांच्यावर तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या साठी पोलिस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विभाग स्थापन करून माहिती संकलीत जात आहे. अंबड पोलिसांनी दिड महिण्यात १२ गुन्हेगारांचा प्रस्ताव पोलिस आयुक्त यांच्या सादर केला पोलिस आयुक्त कार्यालयाकडून सदर प्रस्तावाला मंजूरी मिळाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

यानंतर अंबड पोलिसांनी १२ गुन्हेगारांना नाशिकच्या बाहेर इतर जिल्ह्यात रवाना केले आहे. या शिवाय बहुतांश गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख, पोलिस शिपाई राकेश पाटील, सुधीर आव्हाड, नितीन सानप, गणेश झनकर आदी काम करत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790