नाशिकची घटना: सावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नाशिक (प्रतिनिधी): सराईत गुन्हेगारांने एका महिलेला चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच नवीन नाशकात एका अल्पवयीन मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन नाशकात परिसरात एका 12 वर्षाची अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र बापानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची महिती तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला समजली तिने सदरची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना दिली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार सुरक्षा कायदा (पोस्को ) अंतर्गत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
गोविंदनगर, कर्मयोगीनगर मार्गे गंगापूररोड, निमाणी चक्री बस सुरू करा
नाशिक : टिप्पर गँगमधील तिघांना मोकाअंतंर्गत दहा वर्षाची शिक्षा
नाशिक: पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराचा चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार