नाशिक: सराफावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

नाशिक: सराफावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): श्रमिकनगर येथील सराफ व्यावसायिकावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सोने लुटण्याच्या इराद्याने टोळक्याने सराफावर को’य’त्या’ने वा’र करून गं’भी’र ज’ख’मी केले होते. टोळीतील तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.

४ सप्टेंबर रोजी श्रमिकनगर परिसरात रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास सराफ व्यावसायिक महेश दिलीप टाक हे दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्या डो’क्या’वर व हातावर को’य’त्याने प्रा’ण’घा’त’क ह’ल्ला करून त्यांच्या गळ्यात अडकवलेली बॅग टोळक्याने पळवली होती.

हे ही वाचा:  Breaking: नाशिक हादरलं…नाशिकमध्ये पुन्हा खून; २ जण पोलिसांच्या ताब्यात

या प्रकारामुळे सराफी व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संजय बारकुंड व सहायक पोलिस आयुक्त नवलनाथ तांबे यांच्याकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. गुरुवारी (दि. ९) गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकातील पोलिस हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या माहितीवरून पथकातील कर्मचारी संजय सानप, सोमनाथ शार्दूल, संपत सानप, विजय वरंदळ यांनी फा’शी’चा डोंगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र येथे सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोन जण मोपेड गाडीवरून येताना दिसले.

हे ही वाचा:  पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा

दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असता संदीप चिंतामण अहिरे (वय ३३) रा. शिवशक्ती रो हाऊस, गंगासागरनगर व रोहित रामचंद्र भालेराव (वय ३०) रा. हंसकुटी रो हाऊस, हिंदी शाळेजवळ अशी त्यांनी नावे सांगितली. दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी जावेद ऊर्फ साजन अन्सारी, अमजद खान व प्रतीक एकडे या तिघांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एमएच.१५ एफई ८७१० या क्रमांकाची दुचाकी जप्त केली असून पुढील तपासासाठी आरोपींना सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले असून वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
अभिमानास्पद: ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक!
नगरसेविका पती कन्नू ताजनेंना न्यायालयाचा ५० हजार रुपये दंड
खू’न खटल्यातील फरार बंदिवान २३ वर्षांनी गुजरातमधून अटक
पंचवटी: तडीपार गुन्हेगारच निघाला मोबाइल चोर!

हे ही वाचा:  नाशिक: मुख्याध्यापिका घरी एकटीच; अचानक टोकाचा निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं…

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790