प्रमुख धरणातील साठे ९० टक्क्यांवर पोहोचले
नाशिक (प्रतिनिधी): यंदा जिल्ह्यावर रूसलेल्या वरुणराजाने गत तीन-चार दिवसांत दमदार हजेरी लावली. धरण क्षेत्रातही संततधार सुरू आहे. प्रमुख धरणातील साठे ९० टक्क्यांवर पोहोचले.
हळूवार होणारी वाढ जिल्हावासीयांना सुखावणारी ठरत आहे. नाशिक शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले गंगापूर धरण ९२ टक्के भरले आहे. दारणा ९६ आणि पालखेड ९१ टक्के भरले आहे. आळंदी १०० टक्के, वालदेवी १०० टक्के, कडवा १०० टक्के भरले आहे. कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या चणकापूर ९३ टक्के, हरणबारी १००, नागासाक्या १००, पुनद ९५ आणि माणिकपुंजमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.
गतवर्षीपेक्षा २० टक्के कमीच: जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा हळूवार वाढत असल्याने अन् नव्वदी पार केली असली तरीही लहान-मोठ्या सर्व २४ प्रकल्पांत मिळून सध्याच्या स्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा हा गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के कमीच आहे. या प्रकल्पात ६९ टक्के इतके पाणी उपलब्ध आहे. गेल्यावर्षी आजच्या स्थितीत हाच साठा ८९ टक्के इतका होता.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
अभिमानास्पद: ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक!
नाशिक: सराफावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
नगरसेविका पती कन्नू ताजनेंना न्यायालयाचा ५० हजार रुपये दंड
पंचवटी: तडीपार गुन्हेगारच निघाला मोबाइल चोर!