नाशिक शहरात हे दोन दिवस मांसविक्री बंद राहणार…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात २१ एप्रिल २०२१ तसेच २५ एप्रिल २०२१ हे दोन दिवस मांसविक्री बंद राहणार असल्याचे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे…

बुधवार दिनांक 21/04/2021 रोजी “श्रीराम नवमी” असल्याने सदर दिवशी नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्त लखाने बंद ठेवणेत येतील. सदर दिवशी नाशिक महानगरपालिका क्षेत्रात कुणीही जनावरांची कत्त ल करू नये. या दिवशी जनावरांची कत्त ल करतांना आढळुन आल्यास संबंधीत इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे ही वाचा:  नाशिक: सायंकाळनंतर सिटीलिंक बस मार्गात बदल; देखावे बघण्यास गर्दी वाढत असल्याने निर्णय

तसेच, रविवार दिनांक 25/04/2021 रोजी “महावीर जयंती” असल्याने सदर दिवशी देखील नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्त’लखाने बंद ठेवण्यात येतील व सदर दिवशी नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात जनावरांची कुणीही कत्त ल तसेच मांस विक्री करू नये. या दिवशी जनावरांची कत्त ल करतांना अथवा व मांस विक्री करतांना आढळुन आल्यास संबंधीत इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790