नाशिक शहरात एकाच दिवशी सहा दुचाकींची चोरी !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे.
आता तर एकाच दिवशी शहरात सहा दुचाकींची चोरी झाली आहे.
सरकारवाडा, आडगाव, पंचवटी, गंगापूर, अंबड, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि कैलास चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुलकर्णी गार्डन येथे पार्क केलेली दुचाकी एमएच १५ एफआर ४२४४ ही दुचाकी चोरी करण्यात आली. प्रशांत उब्रे यांची एमएच १५ १९ एडब्लू २६१३ पाइपलाइन रोड, आनंदवली येथील इमारतीच्या पार्किंगमधून चोरी झाली. दिलीप भदाणे रा. सातपूर यांची बुलेट एमएच १५ एफवाय ४८६२ पंचवटी काॅलेज येथे बेसमेंट पार्किंगमधून चोरी झाली. वैभव अहिरवार यांची दुचाकी एमएच १५६ एफएच ३४०५ यशवंत महाराज पटांगण येथून चोरी झाली. भूषण गांगुर्डे यांची दुचाकी एमएच १५ सीजे ५७८४ दिव्या अॅड लॅब त्रिमूर्ती चौक येथून चोरी करण्यात आली. उमेश थोरात यांची दुचाकी एमएच १५ जीडब्लू ३०५३ डीजीपीनगर उपनगर येथून चोरी गेली आहे.