नाशिक: वीजजोडणीसाठी दीड हजाराची लाच घेणारा जेरबंद…
नाशिक (प्रतिनिधी): वीजजोडणीसाठी १५०० रुपयांची लाच घेताना खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
राहुल ज्ञानेश्वर पवार असे या खासगी व्यक्तीचे नाव आहे.
१३ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्जानुसार शासकीय रकमेचे कोटेशन भरले असतानाही वीज मीटर जोडणीसाठी लाचेची मागणी केली. तक्रारदाराने विभागात तक्रार दिली. पथकाने सापळा रचून पवारने पंचासमक्ष मागणी करून १५०० रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. सापळा अधिकारी वैशाली पाटील, शरद हेंबाड, राजेंद्र गीते, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक सुनील कडासने अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यातील खुली पर्यटन स्थळेही बंद