नाशिक: विहिरीच्या खोदकामासाठी बार उडविताना तिघा कामगारांचा मृत्यू

नाशिक: विहिरीच्या खोदकामासाठी बार उडविताना तिघा कामगारांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली. विहिरीचे खोदकाम करताना बार उडविण्यात आला. यावेळी तिघेही कामगार विहिरीत असल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावात ही घटना घडली आहे. या गावात ग्रामपंचायत विहिरीचे खोदकाम सुरू असून या ठिकाणी काही परप्रांतीय कामगार काम करत आहेत. अशातच काल रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. विहिरीत काम करत असताना बार लावण्यात आला.

मात्र याचवेळी कामगार देखील काम करत होते. अचानक बार उडाला. यात तिघे कामगार विहिरीत पडून मृत्यूमुखी पडले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यानंतर लागलीच रोहिले प्राथमिक  उपचार केंद्रातून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमींना नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत नाशिक ग्रामीण पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल असून प्राथमिक तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group