नाशिक: वयोवृद्ध पित्याला मुलाकडून मारहाण, जेवायलाही दिले नाही; पित्याची पोलिसात धाव
नाशिक (प्रतिनिधी): किरकोळ वादातून वयोवृद्ध पित्याने मुलाने जेवायला दिले नाही, म्हणून वयोवृद्ध पित्याने मुलाविरोधात पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
विनायक रत्नाकर पळसेकर (३५, रा. शिवाली अपार्टमेंट, वल्लभनगर) असे मुलाचे नाव आहे.
७३ वर्षीय रत्नाकर पळसेकर यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १४) त्यांच्याकडून मुलगा विनायक याच्या मोटारसायकलीचे नुकसान झाले. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊन त्याने हातोडीने मारून पित्याला दुखापत केली. तसेच जेवायलाही दिले नाही. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार देविदास गाढवे हे तपास करीत आहेत.
- नाशिक: भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मायलेक जखमी
- चांदवडला देवीचं दर्शन झालं, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, चिमुकलीसह आईचा बुडून मृत्यू
- नाशिक: कपडे वाळत घालायचं निमित्त झालं, सुखाचा संसार क्षणात मोडला
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790