नाशिक: लाईट कट करण्याचे सांगत ३ लाख ९८ हजारांना घातला गंडा..पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले

सायबर फ्रॉड: लाईट कट करण्याचे सांगत ३ लाख ९८ हजारांना घातला गंडा..पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले

नाशिक (प्रतिनिधी): सायबर हॅकरचा नवीन फ्रॉड पुढे आला आहे. एमएसईडीसीएलमधून बोलत असल्याचे सांगत तुमचे वीजबिल थकीत आहे.

ते तत्काळ भरा, नाही तर तुमचा वीजपुरवठा पुढील एक तासांत कट होईल असे सांगत ऑनलाइन गंडा घातला जात आहे.

अशाप्रकारे बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला लिंक पाठवत मोबाइलचा ताबा घेत फिक्स डिपॉझिटची रक्कम काढून घेत फसवणूक केली होती.

सायबर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत बँकेला इ-मेल पाठवत पैसे परत मिळवून दिले.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

याबाबत उपआयुक्त संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रामदास शिवराम अमृतकर (७३, रा. साईनाथनगर, वडाळा शिवार) हे सेवानिवृत्त आहे. त्यांच्या मोबाइलवर मेसेज आला. वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. अमृतकर यांनी बिल भरल्याचे सांगितले. हॅकरने तुम्ही भरलेले बिल पेंडिंग असल्याचे दिसत आहे असे सांगत क्वीक सपोर्ट लिंक पाठवली.

अमृतकर यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांचा फोनचा ताबा सायबर हॅकरने घेतला. अमृतकर यांचे इंटरनेट बँकिंगमध्ये प्रवेश करत अमृतकरांच्या ७ लाखांच्या फिक्स डिपॉझिट एफडीमधून प्रत्येकी ९८ हजार असे ३ लाख ९८ हजार ४९८ रुपये ऑनलाईन काढून घेतल्याचा मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दोन तासांत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली, उपनिरीक्षक दानिश मन्सुरी, अनिल राठोड, यांच्या पथकाने उपआयुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

अशी केली फसवणूक : २८ मे रोजी अमृतकर यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकरने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेतला होता. अमृतकर यांच्या मोबाईलमध्ये रिमोट अॅक्सीस अॅप असल्याने पैसे कुठे गेले याची माहिती मिळते. मात्र हॅकर बँकेकडून येणारे मेसेज डिलिट करत असल्याने त्यामुळे रक्कम कुठे वर्ग झाली याची माहिती मिळण्यात अडचण येत होती. सायबर पोलिसांनी बँक खात्याचे बारकाईने निरिक्षण केले. रक्कम क्रेड या क्रेडीट कार्डचे बिल भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वॉलेटमध्ये वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

आयसीआयसीआय बँकेचे दोन क्रिडीट कार्डचे बिल भरल्याचे समोर आले. पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती दिल्याने सर्व व्यावहार होल्ड करण्यात येऊन ४ जून रोजी अपहार झालेली रक्कम पुन्हा अमृतकर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790